अवघ्या काही मिनिटातच ले-इकोचे लाखो हॅन्डसेटस बुक

leeco
नवी दिल्ली : मोबाईल कंपनी ले-इकोचा फ्लॅगशिप स्मार्टफोन ‘ले-इको ले वन एस इको’ भारतात दाखल झाला असून या स्मार्टफोनच्या फ्लॅश सेल सुरू झाल्याझाल्या एक लाख जणांनी हँन्डसेट बुक केला आहे.

सेल दरम्यान फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनची किंमत आहे ९,९९९ रुपये निर्धारित करण्यात आली आहे. या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे मोबाईलसोबत ले इको मेंबरशिपचे एका वर्षाचे सब्सस्क्रिप्शन मोफत दिले जात आहे. या फोनच्या बॅटरीला तुम्ही ५ मिनिट चार्ज केली तर जवळपास ३.५ तासांचा टॉकटाईम तुम्हाला मिळू शकेल, असा दावा कंपनीने केला आहे.

कसा आहे ‘ले-इको ले वन एस इको’
१०८५ X १९२० पिक्सल रिझोल्युशनसोबत ५.५ इंचाचा फूल एचडी डिस्प्ले यात देण्यात आला आहे. त्याचबरोबर १.८५ गिगाहर्टझचा ६४ बिट ऑक्टा कोअर मीडियाटेक हेलिओ एक्स १० soc प्रोसेसर आणि अॅन्ड्रॉईड ५.० लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आले आहे. हा फोन ४ जी सपोर्टिव्ह आहे. याचा रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सलचा तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सलचा आहे. यात ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.

Leave a Comment