कारवाईचे अधिकार ‘ट्राय’ला देणार : दूरसंचार मंत्री

ravi-shankar-prasad
नवी दिल्ली : दूरसंचार नियामक ‘ट्राय’ला दूरसंचार कंपन्यांवर कडक कारवाई करण्यासाठी आवश्यक असणारे अधिकार देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून ग्राहकांना दूरसंचार कंपन्यांनी योग्य सेवा देण्यासाठी सरकारकडून सर्व प्रयत्न करण्यात येतील, असे दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी माहिती देताना म्हटले आहे.

ट्रायने कॉल ड्रॉप झाल्यास दूरसंचार कंपन्यांवर दंड आकारण्यात येणार असल्याचे म्हटले होते. मात्र हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे केंद्र सरकार यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. सध्या सरकार अनेक पर्यायांचा विचार करत असून, ग्राहकांना खराब सेवा देणाऱया कंपन्यांची सेवा सुधारण्यासाठी लक्ष देण्यात येणार आहे. अनेक कंपन्या गुंतवणूक कमी करून फक्त नफा कमविण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्याकडून गुंतवणूक वाढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रसाद यांनी म्हटले आहे.

Leave a Comment