रिलायन्स इंडस्ट्रीज कर्मचा-यांच्या पगारात वाढ

reliance
नवी दिल्ली : चालू वर्षात आपल्या एकूण २० हजार ज्युनियर आणि मध्यम स्तरातील कर्मचा-यांच्या पगारामध्ये देशातील सर्वात जास्त नफा कमाविणा-या रिलायन्स इंडस्ट्रीजने ८ ते १० टक्क्यांनी वाढ केली आहे. कर्मचा-यांना पगारवाढीचे पत्र आज उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर लवकरच वरिष्ठ स्तरातील अधिका-यांच्या पगारामध्येही मोठी वाढ करण्यात येणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले.

जानेवारी-मार्च तिमाहीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजला ७६३० कोटी रुपयांचा नफा झाला आहे. कंपनीने त्यावेळी कनिष्ठ आणि मध्यम स्तरातील कर्मचाऱयांना १०० टक्के वार्षिक रोख रकमेचा बोनस देण्याचे जाहीर केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आपल्या कर्मचाऱयांसाठी सीएपी (करिअर एक्सिलरेटेड प्रोग्राम) चालविते. त्यामुळे कर्मचा-यांना आपल्या कामामध्ये उत्तम वाढ आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी मोठी मदत होते.

Leave a Comment