येथे बेडकाच्या पाठीवर विराजमान आहेत महादेव

beduk
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी जिल्हयात ओयल भागात असलेले एक शिवमंदिर त्याच्या खास वैशिष्ठरयांमुळे प्रसिद्ध असून या भागात हे बेडूक मंदिर या नावाने ओळखले जाते. येथे बेडकाच्या पाठीवर महादेव विराजमान झाले आहेत. मंदिरातील नर्मदेश्वर शिवलिग रंग बदलते असेही सांगितले जाते. राजस्थानी स्थापत्याचा हा मंदिर नमुना मण्डुक तंत्रावर आधारित आहे. मंदिराच्या भितीवर असलेल्या शवसाधनेच्या मूर्ती हे मंदिर तंत्रउपासनेचे मंदिर असल्यचा संकेत देतात.

या मंदिरातील नंदीची मूर्तीही विलक्षण असून हा उभा नंदी आहे. शिवमंदिरात नंदी नेहमी बैठ्या स्वरूपात असतो. हे मंदिर ओयल राजा बख्तसिंह याने २०० वर्षांपूर्वी दुष्काळ निवारणासाठी बांधल्याचे सांगितले जाते. तांत्रिकाच्या सल्ल्यावरून या मंदिराची रचना केली गेली होती व पाऊस चांगला व्हावा यासाठी येथे तंत्रसाधना केली जात असे असे इतिहास सांगतो. दर श्रावणात येथे जलाभिषेक केला जातो. या मंदिराच्या घुमटावर असलेले छत्र पूर्वी सूर्यप्रकाशात फिरत असे मात्र आता ते मोडक्या स्वरूपात आहे.

या मंदिरात असलेली विहीरही वेगळी आहे. ही विहीर जमिनपातळीच्या वर आहे व विहीरीतील पाणी जमिनीच्या पातळीवर असते. विज्ञानानुसार विहीरीतील पाणी जमिनीच्या खालच्या पातळीवर असायला हवे.

Leave a Comment