पाच बाळांसोबत आईने केलेले फोटोशूट सोशल मीडियात व्हायरल

twins
एकाच वेळेच पाच मुलांना ऑस्ट्रेलियामधील एका महिलेने जन्म दिला आहे. या महिलेने पाच बाळांना जन्म दिल्यानंतर आपल्या पाचही बाळांसोबत फोटोशूट केले आहे. हे फोटोशूट सध्या सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल होत आहे.

जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियामधील किंबर्ले आणि वॉन टुच्ची यांच्या घरात क्विन्ट्युपलेट्स अर्थात पाच बाळांना जन्म दिला. या महिलेने अवघ्या दोन मिनिटांमध्ये ४ मुली आणि एका मुलाला जन्म दिला आहे.
twins1
किंबर्ले आणि वॉन या दाम्पत्याला यापूर्वीही दोन मुली आहेत. ज्यावेळी त्यांनी तीस-या बाळाला जन्म देण्याचे ठरविले त्यावेळी त्यांना कळले की किंबर्ले पाच बाळांना जन्म देणार आहे. ही माहिती मिळाल्यापासूनच किंबर्ले आणि वॉन प्रेग्नेंसी टेस्ट किंवा सोनोग्राफी टेस्ट केल्यानंतर आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त करत होते.

आता किंबर्लेने पाच बाळांना जन्म दिला असून त्यांचे फोटोशूट केले आहे. हे फोटोशूट पाहून सर्वांना एक वेगळाच आनंद होत आहे. पाच मुलांना एकाचवेळी जन्म देण्याची ही घटनाही दुर्मिळ आहे.

Leave a Comment