दहा लाख बँक कर्मचारी २९ जुलैपासून संपावर जाणार

strike
हैदराबाद : देशातील जवळपास १० लाखापेक्षा अधिक बँक कर्मचा-यांनी आपल्या अनेक मागण्यांसाठी २९ जुलैपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. हैदराबाद येथे झालेल्या बँक संघटनांच्या संयुक्त बैठकीत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही माहिती अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेच्या वरिष्ठ अधिका-याने दिली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना कमकुवत करणारी धोरणे, अयोग्य गुंतवणूक, बँकांचे एकत्रिकरण आणि विलीनीकरण याच्यासह अनेक मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

Leave a Comment