गुगलला हवेत वर्कींग वुमन इमोजी

work
सोशल मिडीयावर वाढत चाललेल्या इमोजीचा वापर पाहुन नोकरी व्यवसायात असलेल्या महिलांनाही यात चांगले प्रतिनिधित्व मिळावे अशी इच्छा गुगलने व्यक्त केली आहे. त्यासाठी इमोजी संदर्भातली मानके ठरविणार्‍या युनिकोड कंसोर्टियम संस्थेकडे गुगलने वर्कींग वुमन इमोजीसाठीचा प्रस्ताव सादर केला असल्याचे समजते. गुरूवारी गुगलतर्फे हे जाहीर करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गुगलला महिला व्यवसायातील विविधता आणि बालिका सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी इमोजीची नवी श्रृंखला तयार करायची आहे. गुगलच्या सर्वेंक्षणात असे आढळले आहे की ३० वर्षांखालील महिला इमोजीचा सर्वाधिक वापर करतात. वर्कींग वुमन इमोजीसाठीचे नमुनेही गुगलने युनिकोड कंसोर्टियमकडे सादर केले आहेत. यात लॅबकोट, बिझिनेस सूट अशा विविध व्यावसायिक कपड्यांत दाखविेले गेले आहे. या इमोजी वर्षअखेर येतील असेही समजते.

Leave a Comment