सॉफट बँक तुम्हालाही बनवू शकते अब्जाधीश

soft
व्यवसायाची एखादी चांगली कल्पना आहे आणि मनापासून व्यवसाय करायची तीव्र इच्छा आहे अशांसाठी अशी एक बँक आहे जी तुम्हाला अब्जाधीश बनवू शकते. या बँकेने जगाला आजपर्यंत डझनावारी अब्जाधीश दिले आहेत त्यातील चार भारतातील आहेत. चीनच्या अलिबाबा पासून स्नॅपडीलपर्यंत अनेकांचे छोटे व्यवसाय या बँकेमुळे मोठे व्यवसाय बनले आहेत.

गोंधळून जाऊ नका. ही प्रत्यक्षात कोणतीच बँक नाही. ही आहे सॉफ्ट बँक अशा नावाची एक कंपनी. मुख्यत्वे टेलिकम्युनिकेशन व टेक्नॉलॉजी व्यवसायातील स्टार्टअप मध्ये गुंतवणूक करणारी ही कंपनी भारतातही कोट्यावधीची गुंतवणूक करून राहिली आहे. या कंपनीने गुंतवणूक केलेली स्नॅपडील आता भारतातील ३ नंबरची मोठी ई कॉमर्स कंपनी बनली आहे.

या कंपनीच्या गुंतवणुकीमुळे अब्जाधीशांच्या यादीत गेलेले स्नॅपडीलचे सहसंस्थापक कुणाल बहल आज २३१४ कोटींची उलाढाल करत आहेत. या कंपनीत सॉफ्ट बँकेने आक्टोबर २०१४ मध्ये ६२.७ कोटी रूपयांची गुंतवणूक केली होती. ओलाचे सहसंस्थापक भाविश अग्रवाल व अंकित भाटी यांनाही सॉफ्ट बँकेचा असाच हात मिळाला आहे. या कंपनीत सॉफ्ट बँकेने १३८६ कोटींची गुंतवणूक केली असून या दोन्ही सहसंस्थापकाची उलाढाल प्रत्येकी २३८० कोटींवर गेली आहे. ओला ही भारतातील सर्वात मोठी अॅप आधारित टॅक्सी सेवा देणारी कंपनी २०१० साली सुरू झाली होती. इन मोबीचे नवीन तिवारी यांनाही सॉफ्टबँकेमुळे अब्जाधीश यादीत स्थान मिळांले आहे. त्यांची उलाढाल १६६८ कोटींची असून सॉफ्ट बँकेने या कंपनीत ३३ कोटींची गुंतवणूक केली आहे. इनमोबी हे मोबाईल अॅड आधारित स्टार्टअप कंपनी आहे.

Leave a Comment