जगातले सर्वात मोठे विमान भारतात उतरणार

plane
नवी दिल्ली : ‘म्रिया’ नावाचे एक विमान लवकरच भारतात दाखल होणार आहे. या विमानाची बांधणी पूर्ण झाली असून हे विमान लवकरच हैदराबादच्या ‘राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळा’वर पाहायला मिळणार आहे.

यूक्रेन बनावटीचे अॅन्टॉनोव्ह एएन – २२५ ‘म्रिया’ हे विमान काही तांत्रिक कारणांसाठी रात्रभर हैदराबादच्या विमानतळावर दिसेल. पॅराग्वे ते पर्थ असे उड्डाण करताना हे विमान हैदराबादमध्ये काही काळासाठी उतरेल.

काय आहेत ‘म्रिया’ विमानाची वैशिष्ट्य – हे एक कार्गो विमान असून शनिवारी १५ मे रोजी पहिल्यांदाच हे विमान पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या एका खाण कंपनीचे १३० टन वजनी जेनरेटर पर्थपर्यंत घेऊन जाणार आहे. वजन मोठ्ठ असल्याकारणाने हे विमान आपल्या प्रवासात चार जागांवर प्रॉग, तुर्कमेनिस्तान, जकार्तासोबतच हैदराबादमध्येही उतरणार आहे. या विमानाची अधिकतम क्षमता २५० टन वाहून नेण्याची आहे.

Leave a Comment