चाचणीच्या प्रतीक्षेत देशाची सौर रेल्वे

solar-railway
जोधपूर – देशाची पहिली पूर्णपणे सौरऊर्जेवर संचालित रेल्वे रेल्वेच्या जोधपूर कार्यशाळेने तयार केली आहे. यात लाइट-पंखे सौरऊर्जेनेच चालतील. मात्र याची चाचणी पुढे ढकलली जात आहे. प्रवासी याच्या छतावर चढून पॅनेलला नुकसान पोहोचवू शकतात अशी रेल्वेला चिंता आहे.

रेल्वेच्या ज्या मार्गांवर प्रवासी छतावर चढून बसतात तेथे ही रेल्वे चालविली जाऊ शकत नाही असे उत्तर-पश्चिम विभागाचे मुख्य अभियंते बी.एल. पाटील यांनी सांगितले. या रेल्वेच्या चाचणीसाठी सध्या मंजुरी मिळणे शिल्लक आहे. रेल्वे बोर्डाने प्रायोगिक प्रकल्पांतर्गत जोधपूर कार्यशाळेला १.९५ कोटी रुपयांचा प्रकल्प दिला आहे. यानुसार सोलर पॅनेल असणारे ५० डबे बनणार आहेत.

ही रेल्वे प्रारंभीच्या काळात दिवसा चालविली जाणार आहे. नंतर सौरऊर्जेला बॅटरीमध्ये साठवून संध्याकाळी आणि रात्री वापरण्याच्या योजनेवर काम होईल. जयपूरमध्ये अशाप्रकारच्या २२ रेल्वे तयार होणार आहेत. २० डब्यांनी १८८ फे-या केल्या तर वर्षाला ४८ लाख रुपयांची बचत होऊ शकते.

सौरऊर्जेने संचालित रेल्वेशी संबंधित संशोधन आयआयटी बेंगळूरुने केले आहे. जर २० डब्यांच्या रेल्वेने एका वर्षात १८८ फे-या पूर्ण केल्या तर यासाठी जवळपास ९० हजार लिटर डिझेल खर्च होते असे समोर आले. सोलर पॅनेलमुळे हे डिझेल वाचणार आहे.

Leave a Comment