ह्युंडाई ट्यूशॉ भारतात लवकरच येणार

tucson
हयुंडाईच्या ट्यूशॉ या एसयूव्हीच्या चाचण्या चेन्नईत सुरू असून ही गाडी भारतात लवकरच दाखल होत असल्याचे सांगितले जात आहे. ही न्यू जनरेशन प्रिमियर एसयूव्ही दिल्ली ऑटोशो २०१६ मध्ये शोकेस केली गेली होती. ही गाडी ह्युंडाईच्या क्रेटा व सँटाफे या दोन मॉडेलच्या मधले मॉडेल आहे.

ही एसयूव्ही पूर्णपणे नव्या तर्‍हेने डिझाईन केली आहे. हेक्सागोनल ग्रिल फ्रंट अप, स्वेप्ट बॅक हेडलाईट, स्पोर्टी बंपर, स्लोपिंग रूफ, एलईडी टेललँप, टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम, आक्ॅस, यूएसबी, ब्ल्यू टूथ कनेक्टीव्हीटी, इलेक्टीकल लिफट गेट, आठ स्पीकर अशी फिचर्स तिला दिली गेली आहेत. डिझल इंजिनची ही गाडी सहा स्पीड ऑटो ट्रान्समिशन सह आहे. गाडीची किंमत १८ ते २२ लाखांदरम्यान असेल असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment