लंडन – देशामध्ये शाखा उघडणे विदेशी बँकांनी बंद केले आहे. सध्या भारतामध्ये आर्थिक स्थिती सतत बदलत असून, मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करणे बँकांना धोकादायक वाटत असून क्रेडिट रेटिंगमध्ये असलेला धोका लक्षात घेता विदेशी बँका देशात येण्यास तयार नाहीत, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे.
केब्रिज विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘बँक का?’ या विषयावरील विशेष परिसंवादामध्ये ते बोलत होते. मोठी मागणी असूनही बँका देशात येण्यास तयार नाहीत. बँकांची देशात गुंतवणूक करण्याची मोठी इच्छा आहे. मात्र भविष्यातील आर्थिक धोका पत्करण्यास बँका तयार नाहीत, असे राजन यांनी म्हटले आहे.
मी एका उदय़ोन्मुख बाजाराच्या मध्यवर्ती बँकेचा नियामक आहे. विदेशी बँका देशात शाखा सुरू करत नसल्याचे सध्या दिसते आहे. पेडिट रेटिंग आणि उच्च जोखीम यामुळे बँकांना धोका वाटत आहे. आंतरराष्ट्रीय बँकांकडे मोठय़ा प्रमाणात भांडवल आहे. त्यांनी भारतामध्ये मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
विदेशातून बँकांसाठी भांडवल मिळविण्यासाठी आरबीआय प्रयत्नशील आहे. विदेशात आर्थिक स्थिती योग्य नाही. त्यामुळे विदेशातील अनेक बँकांनी भारतामध्ये रक्कम गुंतविल्यास त्यांना मोठा परतावा मिळेल. आम्ही सध्या अनेक धोक्यांवर काम करत आहोत. जागतिक धोक्यांमुळे आम्ही मोठी काळजी घेत आहोत, असे त्यांनी म्हटले.