वर्कींग वुमनही दिसू शकतात स्टायलीश

dress1
आपण स्टायलीश दिसावे अशी इच्छा असणे यात गैर कांही नसले तरी अनेकांना स्टायलिश दिसायचे कसे याचीच कल्पना नसते. ज्यांना हे कळते, ते त्यांची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी होतात मात्र ज्यांना हे जमत नाही ते सदैव आपण कसे दिसतोय याबाबत कॉन्शस राहतात व परिणामी त्यांचे म्हणावे तसे इंप्रेशन पडत नाही. विशेषतः नोकरी करणार्‍या महिलांना म्हणजेच वर्कींग वुमनना स्टायलिश कसे राहावे यासाठी छोटया टिप्स येथे देत आहोत. जेणेकरून कामाच्या ठिकाणी आपला रूबाब राखतानाच परस्पर बाहेर कार्यक्रमांना जाण्याची वेळ आली तरी त्या तितक्याच आत्मविश्वासाने हे कार्यक्रम अडेंट करू शकतील.

टॉप्स- कार्पोरेट क्षेत्रातील महिला नेहमीच पोशाख सुटसुटीत असावा यासाठी दक्ष असतात. त्यातही टॉप वापरताना फार लांबीचे टॉप न वापरण्याची काळजी घ्या. फ्लॉपी टॉप्स चालतील कारण ते आरामदायी असतात. पँट वापरत असाल तर खूप टाईट पँट शक्यतो टाळा. शॉर्ट पँट कांही जणींना शोभतात. तुमची उंची कमी असेल तर हिल्स वापरा. त्यामुळे पाय लांब वाटतील. कांही चांगल्या कॅज्युअल पँटसही बाजारात उपलब्ध आहेत त्या जरूर वापरा.

dress

जॅकेट वापरताना सॉफ्ट ड्रेप्ड जॅकेटला प्राधान्य द्या. ती हलकी असतात व ब्लेझरपेक्षाही जास्त चांगला लूक देऊ शकतात. काळा, ग्रे, नेव्ही ब्ल्यू हे जॅकेटचे कॉमन रंग आहेत. कधीतरी ब्राईट कलरची जॅकेटही आवर्जून वापरा. त्यामुळे स्टायलिश लूक मिळतो. पोशाख काळा असेल तर असे कलरफुल जॅकेट ट्रेंडी लूक देतात.

ड्रेस वापरत असाल तर ऑफिससाठी ते बेस्टच. ऑफिसमधून परस्पर बाहेर जाण्याची वेळ आली तरी ते शोभून दिसतात. मात्र ड्रेस ची निवड करताना भडक रंग टाळा तसेच सार्वजनिक वाहनातून प्रवास करावा लागत असेल तर ते कंफर्टेबल आणि सोईचे आहेत याची खात्री करूनच खरेदी करा.सोबर कलरचे ड्रेस नेहमीच चांगला लूक देतात. आजकाल ट्यूब स्कर्टची फॅशनही जोरात आहे आणि हे स्कर्ट क्लासी दिसतातही. पोटावर जास्त चरबी असेल तर या स्कर्टवर पेपल्म टॉप्सचा वापर उपयुक्त ठरतो हे लक्षात घ्या.

Leave a Comment