भारतात आली एम. व्ही. ऑगस्टाची नवी सुपरबाईक एफ ४

mv-augusta
पुणे : भारतात एम. व्ही. ऑगस्टा या मोटारसायकल निर्माता कंपनीने आपली नवी सुपरबाईक एम. व्ही. ऑगस्टा एफ ४ लाँच केली असून दुचाकींच्या उत्पादन, विक्री आणि सेवेसाठी भारतात एम. व्ही. ऑगस्टा कंपनीने कायनेटिक कंपनीशी करार केला आहे. आता कंपनी आपल्या नव्या दुचाकीची विक्री स्वतःच्या ‘मोटररॉयल’ शोरूम मधून करणार आहे. यानंतर कंपनी दिल्ली, अहमदाबाद, मुंबई, बंगळुरू आणि चेन्नई येथेही ‘मोटररॉयल’ शोरूम सुरू करणार आहे.

नवीन लाँच केलेल्या एम. व्ही. ऑगस्टा एफ ४ दुचाकीचे एफ ४ आणि एफ ४ आरआर हे २ प्रकार विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. पुण्यात एफ ४ ची प्राथमिक किंमत २६ लाख ८७ हजार रूपये एवढी आहे. या गाडीत ९९८ सीसीचे ४ सिलिंडरचे इंजिन लावण्यात आले असून त्याने १९५ हॉर्सपॉवरसह ११ न्यूटन मीटरचा टॉर्क निर्माण होईल. एफ ४ आरआरमध्येही २०१ हॉर्सपॉवरसह ९९८ सीसीचे ४ सिलिंडरचे इंजिन इंजिन लावण्यात आले आहे. या दुचाकीची किंमत ३५ लाख ७१ हजार असून सर्वाधिक वेग २९७.७० किमी/प्रतितास एवढा आहे.

Leave a Comment