दुबई: सोन्यापासून बनवलेली कार दुबईमधील ऑटो शोमध्ये ठेवण्यात आली असून ऑटो शोमध्ये ठेवलेली सोन्याची ही कार सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. या कारचे नाव गॉडझिला असे असून ती कुह्ल रेसिंग ग्रुप या कंपनीने बनवली आहे.
दुबईमध्ये अवतरली सोन्याची कार
१० लाख डॉलर म्हणजेच ६ कोटी ६५ लाख ७७ हजार एवढी या कारची किंमत आहे. निसान आर ३५ जीटी आर रेसिंग कारला मढवून ही सोन्याची कार बनवण्यात आली आहे. या कारला ५४५ एचपी पॉवरचे टर्बो इंजिन बसवण्यात आले आहे. ऑटोमॅटिका दुबई या कार एक्स्पोमध्ये ही कार ठेवण्यात आली आहे.