नवी दिल्लीः आपल्या ग्राहकांसाठी जबरदस्त ‘डबल डेटा’ ऑफर भारती एअरटेलने आणली असून ग्राहकांना या ऑफरमुळे रात्रीच्या वेळी अतिरिक्त इंटरनेट डेटा मिळणार आहे. या ऑफरचा रिचार्ज केल्यास जेवढा डेटा मिळेल, तेवढाच डेटा रात्रीच्या वेळी अतिरिक्त मिळणार आहे.
एअरटेलची इंटरनेटसाठी जबरदस्त ‘डबल डेटा’ ऑफर
ग्राहकांना ऑफरनुसार १८६ रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. यामध्ये एकूण ८०० एमबी इंटरनेट डेटा मिळेल. यातील ४०० एमबी डेटा नेहमीप्रमाणे वापरता येईल, पण रात्री अतिरिक्त ४०० एमबी डेटा मिळणार आहे. तर २९६ रुपयांमध्ये ग्राहकांना २ जीबी डेटा मिळेल, यापैकी १ जीबी सर्वसाधारणपणे वापरता येईल, तर उर्वरित १ जीबी रात्री वापरता येणार आहे. याशिवाय ५४६ रुपयांच्या रिचार्जमध्ये ग्राहकांना ४ जीबी डेटा मिळणार आहे. यापैकी २ जीबी नियमित तर २ जीबी रात्री वापरता येणार आहे.
३ हजार ३४६ रुपयांची मेगाऑफरसुद्धा एअरटेलने ग्राहकांसाठी आणली आहे. यामध्ये एकूण ४० जीबी डेटा मिळणार आहे. यापैकी २० जीबी नियमित तर २० जीबी केवळ रात्री वापरता येणार आहे. ऑफरबद्दल अधिक माहिती एअरटेलच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. स्मार्टफोनची वाढती संख्या आणि ऑनलाईल व्यवहारांची वाढती गरज लक्षात घेऊन एअरटेलने ही ऑफर आणली आहे, असे ही नवीन ऑफर देताना एअरटेलचे मार्केटींग ऑपरेशन संचालक अजय पुरी यांनी सांगितले.