आयबॉलचे स्वस्त लॅपकॉम्पबुक लाँच

iball
मुंबई : इंटेल आणि मायक्रोसॉफ्टच्या साथीने भारतीय इलेक्ट्रॉनिक कंपनी आयबॉलने (iBall) आयबॉल कॉम्पबुक नावाने २ स्वस्त लॅपटॉप लाँच केले असून आयबॉल कॉपबुक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप परसरामपुरिया यांनी लाँच केले. यातील पहिला ‘एक्सिलेन्स’ हा ११.६ इंच स्क्रीन डिस्प्ले असलेला कॉपबुक असून त्याची किंमत ९ हजार ९९९ रूपये आहे. तर १४ इंच स्क्रीन डिस्प्ले असलेल्या ‘एग्जेप्लेयर’ या कॉपबुकची किंमत १३ हजार ९९९ रूपये आहे. या दोन्ही कॉपबुकमध्ये विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टीमचे होम व्हर्जन देण्यात आले आहे.

एक्सिलेन्स कॉपबुकचे वजन १.१० किलो असून एग्जेप्लेयरचे वजन १.१५ किलो आहे. या दोन्ही कॉम्पबुकमध्ये १० हजार एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून ८.३० तास काम करण्याची तिची क्षमता आहे. इंटेल क्वॉड कोअर १.८३ गिगाहर्टझ प्रोसेसरसह यात २ जीबी रॅम देण्यात आली आहे. इंटर्नल मेमरी ३२ जीबी असून एसडी कार्डने ६४ जीबीपर्यंत मेमरी वाढवता येणार आहे.

कोणत्याही लॅपटॉपमध्ये मिळणा-या वायफाय, ब्ल्यूटूथ, एचडीएमआय पोर्ट, २ युएसबी पोर्ट, डय़ुएल स्पीकर, हेडफोनसाठी ३.५ एमएमचा जॅक या सुविधा या कॉपबुकमध्ये देण्यात आल्या आहेत. या दोन्ही लॅपटॉपमध्ये १वर्षाची अतिरिक्त वॉरंटी देण्यात आली आहे.

Leave a Comment