हटके दागिन्यांची क्रेझ वाढती

dagine
सीझन कुठलाही असो, मुली स्वतःला उत्तम प्रकारे मेनटेन करण्याची कला जन्मजातच जाणत असतात. त्यात कॉलेज युवती असतील तर पहायलाच नको. डिझायनर कपडे, मेकअप, त्याला शोभेसे दागिने यात वेगवेगळे प्रयोग करून बघण्याचे त्यांच्यात डेरिंगही अ्रसते कारण शेवटी प्रश्न अ्रसतो तो चार जणांना उठून दिसण्याच्या आाणि सर्वांच्या नजरा आपल्यावर खिळतील याचा प्रयत्न करण्याचा.

एकेकाळी दागिने किंवा ज्युलरी म्हटले की जे जड व मोठ मोठ असलेच पाहिजेत असा समज होता. मात्र आता कपडयांत जशी विविधता आली तशी त्यांना शोभणारे दागिने घालण्याची फॅशनही आपोआपच आली. आजच्या युवती जडबोजड दागिन्यांऐवजी, हलके, हटके दागिने वापरण्यावर अधिक भर देताना दिसत आहेत. यात बोटातल्या अंगठ्या, वेगवेगळ्या प्रकारची ब्रेसलेट, कानातले टॉप्स अथवा इअरिंग्ज व गळ्यात घालण्याच्या विविध प्रकारच्या माळा यांचा समावेश आहे.

हे दागिने निवडताना ते सहज वापरण्यायोग्य, थोडे वेगळे असण्यावर जसा भर दिला जातो आहे तसेच ते कंफर्टबल असण्यासही प्राधान्य दिले जाताना दिसते आहे. शिवाय फॅशन म्हणूनही ते शोभले पाहिजेत यावरही कटाक्ष दिला जातो आहे. अगदी रोजच्या वापरातही शोभतील अश्या दागिन्यांनी बाजार भरून वाहत आहेत. स्टायलीश पॅटर्नच्या या दागिन्यात स्माईली पासून विविध खाद्यपदार्थांची ङिझाईन्स, यांचा समावेश आहे. चेरी, पायनापल इयरिंग्ज, कप केक अथवा अन्य फास्टफूडच्या डिझाईनची ब्रेसलेटस, पक्षी प्राण्यांच्या डिझाईनचे नेकलेस, रिंग्ज यांना मोठी मागणी असल्याचे बाजारात फेरफटका मारताना जाणवते आहे.

Leave a Comment