हजाराची नवी नोट येतेय

1000-ote
मुंबई- रिझर्व्ह बँक १ हजार रूपये मूल्याची नवी नोट लवकरच चलनात आणत आहे.या नोटेवर दोन्ही क्रमांक पॅनल इनसेट मध्ये आर हे अक्षर लिहिले गेले आहे. त्याचबरोबर अन्य सुरक्षा मानकेही आहेत. त्यात वाढत्या साईजचे नोट क्रमांक, कडेने ब्लीड लाईन्स यांचाही समावेश आहे. या नोटेवर गर्व्हनर रघुराम राजन यांची सही आहे व नोटेच्या मागे २०१६ हे साल छापले गले आहे.

या नोटेचे डिझाईन २००५ च्या महात्मा गांधी सिरीजमधवील नोटेप्रमाणेच आहे. नवीन नोटा चलनात आल्या तरी जुन्या नोटाही वैध राहणार असल्याचे रिझर्व्ह बँकेकडून कळविले गेले आहे.

Leave a Comment