७२ वर्षी आजीबाई बनली माता!

babay
अमृतसर – येथील एका वृद्ध दांपत्याला विवाहानंतर तब्बल ४६ वर्षांनी अपत्यप्राप्ती झाली असून माता बनलेली महिला ७२ वर्षांची वृद्ध महिला आहे.

७ ऑक्‍टोबर १९७० रोजी गिलवाली येथील रहिवासी मोहिंदरसिंग यांच्याशी पंजाबमधील तरन तारन जिल्ह्यातील रसूलपूर गावात जन्मलेल्या दालजिंदर यांचा विवाह झाला. विवाहानंतर अनेक वर्षे त्यांना अपत्य प्राप्त झाले नव्हते. त्यानंतर त्यांना अनेकांनी मूल दत्तक घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यांनी मूल दत्तक घेतले नाही. अखेर हिसर येथे व्हिट्रो फर्टीलायझेशन (आयव्हीएफ) पद्धतीद्वारे त्यांना १९ एप्रिल २०१६ रोजी पुत्ररत्न प्राप्त झाले. नव्या बाळाचे वजन २ किलो असून त्याची आई ७२ वर्षांची असल्याचा दावा रुग्णालयाने केला आहे. नव्या बाळाचे नामकरण अरमान असे केले आहे. याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना दालजिंदर म्हणाले, मला अनेकांनी मूल दत्तक घेण्याविषयी सुचविले होते. मात्र माझा माझ्या नशीबावर विश्‍वास होता. अखेर देवाने (वाहेगुरु) माझी प्रार्थना ऐकली. यापूर्वी २००८ साली हरियाना येथील राजो देवी नावाच्या महिला जगातील सर्वाधिक वयाच्या माता ठरली होती. त्यांना वयाच्या सत्तराव्या वर्षी अपत्य प्राप्त झाले होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment