‘०’ बॅलन्स बचत खात्यावर असल्यास दंड नाही

rbi
मुंबई – बँकेतील बचत खात्यात (‘०’ बॅलन्स) काहीच रक्कम शिल्लक नसल्यास बँक दंड म्हणून त्याच्या खात्यावरील रक्कम कापू (मायनस) शकत नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) घेतला आहे.

या संदर्भात बँकांना आरबीआयने दिलेल्या सूचनेनुसार, बचत खात्यातील किमान रक्कम (मिनिमम बॅलेन्स) शून्य झाल्यानंतर देखभाल शुल्क (मेंटनंन्स चार्जेस) न आकारण्याचे आदेश दिले आहेत. बचत खात्यात रक्कम शिल्लक नसताना त्यावर कोणतीही बँक दंड किंवा शुल्क आकारत असल्यास ग्राहक त्याची आरबीआयकडे तक्रार करू शकतो. अशा तक्रारी पगार जमा होणार्‍या खात्याबाबत जास्त असून नोकरी देणारी कंपनी कर्मचाऱ्याचे नवीन बॅंक खाते उघडते. मात्र बर्‍याचदा कर्मचाऱ्याने नोकरी बदलल्यानंतर पगारी खात्याचे बचत खात्यात रुपांतर केले जाते. मग त्यावर देखभाल शुल्काचा नियम लागू केला जातो. यामुळे मात्र बचत खात्यात उणे रक्कम (मायनस बॅलेन्स) दाखवली जाते.

आरबीआयने बँकांना तसे न करण्याची सूचना एप्रिल २०१५ पासून दिली होती. त्याची आता अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. ज्या ग्राहकाच्या बचत खात्यात रक्कम शिल्ल्क नसेल अश्या ग्राहकांना आगाऊ सूचना देण्यास सांगितले आहे.

Leave a Comment