शाओमीचा एमआय मॅक्स लाँच

mimax
चीनी स्मार्टफोन उत्पादक शाओमीने चीनमधील एका इव्हेंटमध्ये त्यांचा नवा स्मार्टफोन एमआय मॅक्स सादर केला आहे. याच कार्यक्रमात रोम एमआययूआय एट ही लाँच केले गेले आहे. या स्मार्टफोनसाठी ६.४४ इंची फुल एचडी स्क्रीन दिला गेला आहे. शिओमीच्या आजपर्यंतच्या स्मार्टफोनमध्ये हा स्क्रीन सर्वात मोठा आहे.

या फोनसाठी संपूर्ण मेटल बॉडी दिली गेली असून तो डार्क ग्रे, गोल्ड व सिल्व्हर रंगात उपलब्ध आहे. फोनची जाडी ७.५ एमएम आहे व त्याच्या बॅक साईडला फिंगरप्रिंट स्कॅनर दिला गेला आहे. रियर कॅमेरा १६ एमपीचा व एलईडी फलॅशसह आहे तर फ्रंट कॅमेरा ५ एमपीचा आहे. या फोन फोरजी, एलटीई, वायफाय, ब्ल्यू टुथ, जीपीएस कनेक्टीव्हीटीसाठी ऑप्शन आहेत वी हायब्रिड सिम ट्रे, इन्फ्रारेड ब्लास्टर जो रिमोट कंट्रोलसारखे काम करतो, शिवाय अँबिएंट लाईट सेन्सर, प्राक्सिमिटी सेंसर, झायरोस्कोप, एक्स्लोमीटर अशी फिचर्सही दिली गेली आहेत.

हा फोन तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करून दिला आहे. एकात ३ जीबी रॅम,३२ जीबी मेमरी असून त्याची किंमत १५ हजार रूपये आहे. दुसर्‍या व्हेरिएंटमध्ये ३ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल मेमरी असून त्याची किंमत १७ हजार रूपये व तिसरे व्हेरिएंट ४ जीबी रॅम व १२८ जीबी मेमरीसह आहे. त्याची किंमत आहे २०,५०० रूपये.

Leave a Comment