‘पायरेटेड सैराट’सोबत मिळवा ‘तात्या व्हायरस’?

virus
सैराटची पायरेटेड कॉपी मोबाईलवर डाऊनलोड करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची असू शकते, सैराटची पायरेटड कॉपी डाऊनलोड करताना, अथवा ट्रान्सफऱ करताना, मोबाईलमध्ये व्हायरस आल्याचे काहींनी व्हॉटसअॅपवर लिहिले आहे.

अनेकांचा मोबाईल यामुळे हँग होणे, अथवा डेटा डिलीट होणे, सॉफ्टवेअरच्या अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे. आयफोनला ही अडचण येत नसल्याचीही चर्चा आहे. सैराट चित्रपटाची पायरेटेड कॉपी मोठ्या प्रमाणात मोबाईलवर फिरत आहे, पण त्यासोबत ‘तात्या व्हायरस’चाही मोबाईलमध्ये शिरकाव होत असल्याची चर्चा आहे.

Leave a Comment