डॉलरच्या तुलनेत ७ पैशांनी घसरला रुपया

dollar
मुंबई : आज डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण झाली असून सकाळच्या सत्रात रुपयात ७ पैशांची घसरण झाली आहे. सध्या डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ६६.८४ रुपये इतके झाले आहे. डॉलरची मागणी फॉरेन एक्सचेंजकडे आयातदार आणि बँकांकडून वाढली असल्याच्या परिणामी इतर देशांच्या चलनांच्या तुलनेत देखील अमेरिकी डॉलर वधारतो आहे. आजच्या सत्रामध्ये इंट्राडे व्यवहारात डॉलरने ६६.७९ रुपयांची उच्चांकी तर ६६.८९ नीचांकी पातळी गाठली आहे.

Leave a Comment