केवळ १,९९९ रुपयांत ‘लेनोवो’चा १० हजारांचा स्मार्टफोन !

lenova
मुंबई – आपल्या ‘के३ नोट’ या स्मार्टफोनवर सध्या लेनोवो कंपनीने दमदार ऑफर सुरू केली आहे. या ऑफरमध्ये मोबाईलप्रेमींना लेनोवो ‘के३ नोट’ हा ९,९९९ रुपयांची मूळ किंमत असलेला स्मार्टफोन केवळ १,९९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे.

एक खास एक्सचेंज ऑफर ‘लेनोवो’ने सुरू केली आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन देऊन हा १० हजारांचा स्मार्टफोन खरेदी करू शकता. तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या रिसेल किमतीनुसार ‘के३ नोट’च्या मूळ किमतीत तुम्हाला सूट मिळू शकेल. त्यानुसार तुम्ही हा स्मार्टफोन तब्बल १,९९९ रुपयांपर्यंतच्या कमी विकत घेऊ शकता.

लेनोवो ‘के३ नोट’ या स्मार्टफोनचा डिस्प्ले ५.५ इंचाचा असून यात ६४ बीटचे १.५ गिगाहर्ट्स ऑक्टाकोअर प्रोसेसर देण्यात आले आहे. याशिवाय, २ जीबीची तगडी रॅम फोनमध्ये आहे. ‘के३ नोट’चे खास वैशिष्ट्य म्हणजे या स्मार्टफोनचा कॅमेरा. के३ नोटला १३ मेगापिक्सेलचा रिअर, तर ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. ‘के३ नोट’ची अंतर्गत मेमरी १६ जीबी, तर मायक्रो एसडी कार्डच्या सहाय्याने ३२ जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. फोनला ३००० mAH च्या क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

1 thought on “केवळ १,९९९ रुपयांत ‘लेनोवो’चा १० हजारांचा स्मार्टफोन !”

Leave a Comment