आग्रा ते इटावा – देशातला पहिला सायकल हायवे

cycle
उत्तरप्रदेशातील आग्रा ते लायन सफारी असलेल्या इटावा पर्यंत देशातला पहिला सायकल हायवे बांधला जाणार असून हा प्रस्ताव अखिलेश सरकारच्या विचाराधीन आहे. पाटबंधारे विभागातर्फेच हा हायवे बांधला जाणार असून या हायवे वरून सायकलशिवाय अन्य कोणत्याही प्रकारच्या वाहनांना परवानगी दिली जाणार नाही असे समजते.

हा हायवे १९५ किमीचा असेल व अडीच मीटर रूंदीचा हा रस्ता आरसीसी मध्ये बांधला जाईल. आग्रा इटावा हायवे पासून हा अलग बांधला जाणार आहे. यामुळे रस्त्यातील गांवे, बाजार यापासून तो अलग असेल. या हायवेच्या दोन्ही बाजूंना फुलझाडे व मोठी झाडे लावली जाणार आहेत तसेच रात्रीच्या वेळी सोलर लाईटने हा रस्ता उजळला जाणार आहे. झाडांमुळे सायकल चालकांना व पर्यटकांना उन्हापासून संरक्षण मिळू शकणार आहे. या हायवेवर सुरक्षेचे सर्व उपाय असतील असेही समजते. देशी विदेशी पर्यटकांची सोय लक्षात घेऊन हा हायवे बंाधला जाणार आहे.

Leave a Comment