OMG…. एकही विधवा महिला या गावात नाही

widow
बेहंगा(मंडला) : पतीच्या निधनानंतर विधवा झालेल्या महिलांना अद्यापही समाजात काही ठिकाणी सन्मानाची वागणूक दिली जात नाही. विधवांनी पुन्हा लग्न करणे तर काही ठिकाणी निषिद्ध मानले जाते, पण मध्य प्रदेशमधील मंडला जिल्ह्यात एक असे गाव आहे जिथे एकही महिला विधवा नाही. तेथील प्रथेनुसार एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास त्याच कुटुंबातील अविवाहित पुरुषाशी लग्न करावे लागते. मग तो पुरुष नातूही का असेना.

याच गावातील पतीराम वारखेडे सांगतात, जेव्हा मी सहा वर्षांचा होतो तेव्हा माझ्या आजोबांचे निधन झाले. मात्र प्रथेनुसार निधनानंतरच्या नवव्या दिवशी पतीरामला त्याच्या आजीसोबत विवाह करावा लागला. या विवाहाची प्रथा म्हणजे विधवा झालेल्या महिलेला विशेष डिझाईन असलेल्या चांदीच्या बांगड्या दिल्या जातात. या बांगड्यांना पाटो असे म्हटले जाते. विवाहाचे सर्व रितीरिवाज पार पडतात. मात्र जेव्हा मी मोठा झालो तेव्हा माझ्या पसंतीच्या मुलीशी माझा विवाह झाला. या अनोख्या प्रथेमुळेच या गावात एकही महिला विधवा नाही.

Leave a Comment