१७ मे रोजी लाँच होणार ‘मोटो जी ४’चे दोन व्हर्जन ?

moto-g4
मुंबई : मोटोरोलाच्या सर्वाधिक लोकप्रिय सीरिज मोटो जी मधील पुढील व्हर्जन म्हणजेच मोटो जी ४ याच महिन्यात लाँच होणार आहे. यासोबतच मोटो जी प्लस हे नवे व्हर्जनही लाँच करण्यात येण्याची शक्यता असून मोटो जी ३ आणि पाठोपाठ मोटो जी टर्बो हे नवीन व्हर्जन यापूर्वी लाँच केले होते.

मोटो जी ४ आणि मोटो जी ४ प्लस हे दोन्ही पूर्णपणे वेगवेगळ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सचे स्मार्टफोन असून मोटो जी ४ आणि मोटो जी ४ प्लस हे दोन्ही व्हर्जन याच महिन्याच्या १७ मे रोजी भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. मोटोरोलाच्याच एक्स सिरीजमधील नव्या स्मार्टफोनचेही लाँचिंग भारतात होणार आहे. त्याची तारीख अजून निश्चित करण्यात आलेली नसली तरी जूनच्या ९ तारखेला मोटो एक्स मालिकेतील दोन स्मार्टफोन बाजारपेठेत दाखल होतील.

मोटो जी च्या नव्या स्मार्टफोनचे नाव मोटो जी ४ किंवा मोटो जी फोर्थ जनरेशन किंवा मोटो जी २०१६ असेही असेल. मोटो जी ४ प्लस असे जास्तीचे आणि सुधारीत स्पेसिफिकेशन्स असलेल्या मॉडेलचे नाव आहे. मोटो जी ४ प्लस या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर हा आजवर फक्त हायएन्ड स्मार्टफोन्सपुरतेच मर्यादित असलेले फीचर असणार आहे.

१७ मे रोजी भारतात लाँच होणाऱ्या मोटो जी ४ या स्मार्टफोनमध्ये २ जीबी रॅम, १६ जीबी मेमरी आणि १६ मेगापिक्सेल कॅमेरा असण्याची शक्यता आहे तर मोटो जी ४ प्लस या व्हर्जन मध्ये ३ जीबी रॅम, ३२ जीबी मेमरी आणि १६ मेगापिक्सेल कॅमेरा असणार आहे. मोटो जी ४ प्लसचा कॅमेरा लेझर ऑटोफोकस तंत्राने सज्ज असेल तसेच दोन्ही स्मार्टफोनमध्ये एनएफसी म्हणजे ‘नियर फिल्ड कम्युनिकेशन’ कनेक्टीव्हिटीचा पर्याय असेल.

Leave a Comment