रेल्वे तिकीटांवरही देता येणार जाहिराती

tikit
दिल्ली – रेल्वे मंत्रालयाने रेल्वे विभागाच्या कमाईत वाढ करण्यासाठी आता रेल्वे तिकीटांवरही जाहिराती करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नव्या नियमानुसार रेल्वे रिझर्व्हेशन तिकीटाच्या आकारात ७० टक्के जागा जाहिरातींसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे व उरलेल्या ३० टक्के भागात प्रवाशाची आवश्यक माहिती असेल. यासाठी रेल्वे तिकीटाचा आकारही थोडा मोठा केला जाणार आहे.

जाहिराती व अन्य मार्गाने होऊ शकणारी कमाई यावर देखरेख करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने स्वतंत्र डायरेक्टोरेटची स्थापना केली आहे. हा विभाग रेल्वेशी संबंधित नॉन रेव्हेन्यू कमाईवर मॉनिटरींग करेल तसेच अन्य माध्यमातून रेल्वेला मिळणार्‍या उत्पन्नांवरही लक्ष ठेवेल. रेल्वे मंत्रालयाने या संदर्भातली पत्रे सर्व विभागांना रवाना केली आहेत. जाहिराती घेताना स्थानिक पातळीवरही त्या घेतल्या जाणार आहेत.

Leave a Comment