‘जियो’,‘व्होडाफोन’सोबत बीएसएनएलचा रोमिंग करार

bsnl
नवी दिल्ली – या महिन्यामध्ये रिलायन्स जियो आणि व्होडाफोनसोबत २जी रोमिंग करार सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएल करणार आहे. याच्यासह कंपनी दोन सर्कल राजस्थान आणि महाराष्ट्रामध्ये स्पेक्ट्रम भागीदारी करारासाठी भारती एअरटेलसोबत चर्चा करत आहे.

बीएसएनएल मोबाईल बेस स्टेशनमध्ये देशात दुस-या स्थानावर आहे. बीएसएनएलच्या बेस स्टेशनची संख्या १.१४ लाख आहे आणि कंपनी आणखी २१ मोबाईल टॉवर आणखी लावण्याच्या प्रक्रियेत आहे. हा करार झाल्यानंतर बीएसएनएल ग्राहकांना रिलायन्स जियो आणि व्होडाफोन नेटवर्क वापरण्याची सुविधा मिळणार आहे.

बीएसएनएल कंपनी ग्रामीण क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर आहे. अन्य कंपन्या गुंतवणूक कमी करून नफा कमविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे त्या ग्रामीण क्षेत्रात कमी गुंतवणूक करत आहेत. त्याचा फायदा बीएसएनएलला होत असल्याचे बीएसएनएलचे अध्यक्ष अनुपम श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.

Leave a Comment