जगातले पहिले इलेक्ट्रीक विमान २०१८ त येणार

viman
जगातले पहिले इलेक्ट्रीक व्हर्टीकल टेक ऑफ व लँडींग विमान तयार झाले असून बाजारात ते २०१८ साली विक्रीसाठी येईल असे समजते. अंड्याच्या आकाराचे हे विमान दोन सीटर आहे व खासगी जेट म्हणून त्याचा वापर होऊ शकतो. हे विमान व्हर्टीकल लँडींग व टेकऑफ करू शकते त्यामुळे त्यासाठी विमानतळ अथवा जमीनीची गरज लागत नाही. ते घरावरही उतरू शकते.

युरोपियन स्पेस एजन्सीच्या देखरेखीखाली म्युनिक विद्यापीठातील चार पदवीधर इंजिनिअर्सनी हे विमान तयार केले आहे. त्याचे नामकरण लिलियम असे केले गेले आहे. त्याचा टॉप स्पीड ताशी ४०२ किमी असून त्याची क्षमता एका चार्जमध्ये ४८२ किमी उड्डाणाची आहे. हे इलेक्ट्रीक विमान असल्याने त्याचा आवाज येत नाही तसेच त्यामुळे हवेचे प्रदूषणही होत नाही. आकाराने लहान असल्याने त्याला ५० बाय ५० ची जागा पुरते. हे विमान ६०० किलो वजन वाहून नेऊ शकते. रोजच्या वापरासाठी ते अत्यंत उपयुक्त असल्याच्या निर्मात्यांचा दावा आहे.

हे विमान चालविण्यासाठी पायलटला फक्त २० तासांचे प्रशिक्षण पुरेसे ठरते. तसेच हे विमान फक्त दिवसा व हवामान स्वच्छ असतानाच उडू शकते.

Leave a Comment