गुडघे टेकलेल्या हिटलरच्या पुतळ्याची ११४ कोटींना खरेदी

hitlar
जर्मनीचा हुकुमशहा हिटलर याच्या मेण्याच्या पुतळ्याला लिलावात ११४ कोटी रूपयांची किमत मिळाली असल्याचे समजते. हा पुतळा क्रिस्टी तर्फे लिलावात अन्य ३९ वस्तूंसह मांडला गेला होता. इटलीचा आर्टिस्ट माऊरीजियो कॅटलन याने हिटलरचा हा गुडघे टेकलेला व दोन्ही हात पुढे बांधलेला पुतळा २००१ मध्ये तयार केला होता. मात्र जेव्हा जेव्हा तो प्रदर्शनात मांडला गेला तेव्हा तेव्हा दंगे उसळले होते. कॅटलनने या पुतळ्याचे नामकरण हिम असे केले होते व दुसर्याे जागतिक महायुद्धानंतरची ही सर्वात घाणेरडी व द्वेष पसरविणारी कलाकृती असल्याचा दावा केला जात होता.

कॅटलने यापूर्वीही वादग्रस्त पुतळे तयार केले आहेत. मात्र त्याच्या कलाकृतीला मिळालेली सर्वाधिक किंमत ही हिटलरच्या पुतळ्याला मिळाली आहे. त्याने सांगितले हजार वेळा हा पुतळा फोडून टाकावा अशी मला इच्छा होत होती मात्र मी तसे करू शकलो नाही. या पुतळ्याचे पोस्टर मिलानमध्ये छापले जात असताना तेथील महापौरांनी या छपाईवर बंदी घातली होती असेही समजते. कॅटलन याने अमेरिकेचे अध्यक्ष केनेडी यांचा शवपेटीकेतील पुतळा व पोप जॉन पॉल यांना मेटेडोर( म्हणजे झुंजीतील बैल) कुचलून ठार करत असलेले पुतळेही या पूर्वी तयार केले आहेत.

Leave a Comment