आता गुगलचेही नवे अॅप

google
वॉशिंग्टन- सध्याच्या तरुणाईचा मेसेजिंग व चॅटिंग एक अविभाज्य भाग बनला असून हेच हेरून गुगलही आता मोबाइल मेसेजिंग अॅप्लिकेशन सुरू करणार आहे.

फेसबुकच्या ‘व्हॉट्सअॅप’ आणि मेसेंजर या अॅपप्रमाणेच ‘टेनसेंट‘चे ‘वी चॅट’ हे अॅप्लिकेशनही लोकप्रिय आहे. गुगलचीदेखील ‘हँग आउट’ ही सुविधा सध्या उपलब्ध आहे. यातील सुविधांच्या तुलनेत अधिक सरस अॅप तयार करण्याचा गुगलचा प्रयत्न असून प्लेस्टोअरवर गुगलचे हे नवे ‘अॅप’ कधी उपलब्ध केले जाणार आणि त्याचे नाव काय याबात अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.

गुगलची स्पर्धा सोशल नेटवर्किंगमधील आघाडीचे संकेतस्थळ असलेल्या फेसबुकशी असून, फेसबुक देत असलेल्या सुविधा अॅपमध्ये देण्याचा गुगलचा प्रयत्न असल्यामुळे फेसबुकशी थेट स्पर्धा करण्यासाठी गुगल हे ‘अॅप’ तयार करीत असल्याचे स्पष्ट आहे. मेसेजिंग आणि चॅटिंग एवढ्यापुरतेच हे ‘अॅप’ मर्यादित राहणार नसून, कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशल इंटेलिजन्स) आधारित ‘नो-हाऊ’, इंटिग्रेटेड चॅटबोट्स आणि ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचीही सुविधा या ‘अॅप’मध्ये दिली जाणार आहे.

Leave a Comment