व्हॉट्सअॅपवर लवकरच व्हिडीओ कॉलिंगची सुविधा!

whatsapp
मुंबई : कोट्यवधी गॅझेटप्रेमींचा आवडता पर्याय असलेल्या व्हॉट्सअॅपवर लवकरच व्हिडीओ कॉलिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. स्काईप या मायक्रोसॉफ्टच्या इन्स्टंट मेसेजिंग अॅपमध्ये सध्या व्हिडीओ कॉलिंगची सुविधा आहे. म्हणजेच भविष्यात व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलिंगच्या सुविधेनंतर स्काईपशी स्पर्धा करताना दिसेल.

पहिल्यांदा आयओएस स्मार्टफोनवर म्हणजेच आयफोनवर व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉलिंगची चाचणी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअॅप बिटा अॅप वापरण्याची सुविधा ज्या स्मार्टफोनमध्ये आहे, त्यांनाच पहिल्या टप्प्यात ही सुविधा वापरता येईल.

व्हिडीओ कॉलिंगसोबतच व्हॉट्सअॅपवर झिप फाईल शेअरिंग सपोर्ट, व्हाईसमेल यासारख्या सुविधाही दाखल होण्याची शक्यता आहे. अँड्राईड ओएसबाबत सातत्याने नवीन माहिती पुरवणाऱ्या अँड्राईड पोलीस या वेबसाईटने याविषयीचा तपशील जारी केला आहे. अर्थातच ही माहिती लीक आहे. व्हिडीओ कॉलिंग फीचरविषयी अजून अधिकृतपणे व्हॉट्सअॅपकडून काहीच अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

Leave a Comment