दुबईलाही करावी लागते वाळू आयात

dubai
जगभरात सर्वत्रच सध्या निर्माण कार्ये जोरात सुरू असल्याने वाळूची प्रचंड मोठी गरज निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे वाळवंटातच असलेल्या दुबईलाही वाळूची चणचण जाणवत असून तेथे मोठ्या प्रमाणावर वाळू आयात केली जात आहे.

दुबईत सध्या प्रचंड मोठी बांधकामे होत आहेत तसेच तेलविहीरी खोदतानाही मोठ्या प्रमाणावर वाळूचा वापर केला जातो. मिळालेल्या माहितीनुसार २०१३ मध्ये तेलविहीर खोदण्यसाठी २ हजार टन वाळू लागत असे . नवीन तंत्रज्ञान वापरात आल्यानंतर म्हणजे २०१५ सालात तेल विहीरीसाठी ४४०० टन वाळू वापरली जात आहे. दुबईत २०१४ सालात ४५६ दशलक्ष डॉलर्स किमतीची वाळू व खडी आयात केली गेली आहे. दुबईतील बहुतेक बांधकामे या आयात वाळूवरच केली गेल्याचेही सांगितले जात आहे.

सध्या चीनकडून जगातील सर्वाधिक वाळू आयात होत आहे. संयुक्त राष्ट्राकडून मिळालेल्या माहितीनुसार जगातील एकूण वाळूपैकी एक पंचमांश वाळू एकट्या चीनमध्ये आयात केली जात आहे. नवीन रस्ते, इमारती, कारखाने, धरणे यासाठी ही वाळू आयात होत आहे.गेल्या चार वर्षात चीनमध्ये जेवढी वाळू आयात झाली तेवढी गेल्या १०० वर्षात अमेरिकेतही झालेली नाही असेही समजते.

Leave a Comment