झोपेतील गडबड अयोग्य आहारामुळे

sleep
अनेक लोकांना दिवसा नको तेव्हा झोप येते आणि रात्री हवी असताना ती येत नाही. त्याच बरोबर रात्री झोप आलीच तरी ती शांतपणे लागत नाही. या सगळ्यामागची कारणे काय असतात. यावर प्रदीर्घ संशोधन झाले आहे. परंतु आहारातील बदलामुळे असे घडते असे नवे संशोधन आता पुढे आले आहे. आपण फार थकल्यामुळे झोप येते असे आपण मानतो परंतु वस्तुस्थिती अशी आहे की झोपेचा थकण्यापेक्षा खाण्याशी जास्त संबंध आहे. तुपकट, तेलकट, तळलेले तसेच अतीगोड पदार्थ खाल्ले की झोपेत अनियमितता येते, असे मत आहारतज्ञ डॉ. ध्वनी शहा यांनी व्यक्त केले आहे.

आपण रात्री भरपूर जड अन्न खाल्ले असेल तर झोपेत शांतता राहत नाही. त्याचबरोबर मोबाईल फोन आणि टी.व्ही.वरील मालिका यांचाही परिणाम झोपेवर होत असतो. या संबंधात १८०० जणांवर प्रयोग करण्यात आले आहेत. त्यांना सातत्याने आहारात बदल सुचवण्यात आले आणि आहारात वारंवार होणार्‍या बदलानुसार त्यांच्या झोपेचा पॅटर्न बदलतो याचे निरीक्षण करण्यात आले तेव्हा गोड आणि तळलेले पदार्थ खाल्ल्या दिवशी शांत झोप लागली नाही असे दिसून आले.

दूरचित्रवाणीवरील मालिकांचाही झोपेवर परिणाम होतो. टी.व्ही.वरील मालिका मनाला अस्वस्थ करत असतात. किंबहुना त्या मालिकांची प्रत्येक कडी ही मनाला अस्वस्थ वाटेल अशा घटनेने संपवलेली असते. आपला प्रेक्षक किंवा श्रोता मालिकेशी बांधला जावा यासाठी कथानकाची अशी रचना केलेली असते. म्हणून श्रोत्यांचे पित्त खवळते आणि तशा अवस्थेत त्या मालिकेची ती कडी बघून झोपणार्‍या प्रेक्षकाला रात्री नीट झोप येत नाही. या व्यतिरिक्त मोबाईलचा वापरही झोपेतल्या गडबडीचे कारण असतेच.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment