रिलायन्सचा लाईफ फाईव्ह लाँच

life5
रिलायन्सने आपल्या लाईफ सिरीजचा विस्तार करताना नवा स्मार्टफोन लाईफ फाईव्ह सादर केला आहे. हा ड्युअल सिम फोन व्होल्ट सपोर्ट करणारा असून सध्या तो फक्त अॅमेझॉनवरूनच खरेदी करता येणार आहे. या फोनची किंमत आहे ११६९९ रूपये.

या फोनसाठी पाच इंची एचडी डिस्प्ले दिला गेला आहे. त्याला ड्रॅगन टेल ग्लास प्रोटेक्शन दिले गले आहे. अँड्राईड ५.१ लॉलिपॉप ओएस, २ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी दिली आहे. मात्र ही मेमरी वाढविण्याची सुविधा नाही. या फोनसाठी १३ एमपीचा एलईडी फ्लॅशसह रियर तर ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. हा फोन फोरजी एलटीई, व्होल्ट, थ्रीजी, वायफाय, जीपीएस, ब्ल्यू टूथ सपोर्ट करतो.

Leave a Comment