क्विन्सलँडमध्ये आकाशात पहा ढगांचा समुद्र

dhag
निसर्ग पृथ्वीच्या कोणत्या कोपर्‍यात काय चमत्कार घडवेल हे सांगणे अवघड. जगभरात हवामानाच्या विशिष्ठ पॅटर्नमुळे अजब दृष्ये माणसांना पाहाता येतात आणि निसर्गाचे हे चमत्कार मानवी डोळ्यांना अद्भूत मेजवानी देऊन तृप्तही करतात. ऑस्ट्रेलियातील क्विन्सलँडमध्येही जमीनीपासून २०० मीटर उंचीवर असाच नजारा पाहायला मिळतो. येथे समुद्राच्या लाटांप्रमाणे ढग आकार घेतात आणि जणू आकाशातच समुद्र निर्माण होतो. ग्लायडर्स पायलट लोकांना हे ढग मोठ्या प्रमाणावर आकर्षित करतात.

सुरवातीला या ढगांना विमानातून निघणारा धूर समजले जात असे. मात्र विमानाचा धूर थोड्या वेळात नष्ट होतो. हे ढग दीर्घकाळ दिसतात म्हणून त्यावर संशोधन केले गेले तेव्हा आढळले की येथील जमीन व समुद्राच्या विशिष्ठ आकारामुळे हे ढग तयार होतात. त्यांना मॉर्निंग ग्लोरी असे सार्थ नांव दिले गेले आहे. हे ढग १ हजार किमी लांबीचे व २ किमी उंचीचेही असू शकतात.नॉर्थ क्विन्सलँडमधील बर्केट शहरात पावसाळ्यापूर्वी, सप्टेंबरच्या अखेरी व नोव्हेंबरच्या सुरवातीला हा नजारा पाहता येतो. मात्र हे ढग येताना वादळ घेऊन येतात. त्यात वीजाही होतात. वादळ या ढगांच्या मागे असेल तर हे ढग ताशी ६० किमीच्या वेगाने हालतातही. त्यावेळी विजा होणे, गारा पडणे असेही प्रकार होतात.

असेच ढग कधीकधी अमेरिका, इंग्लीश चॅनल, म्युनिच, बर्लीन, रशियाचा कांही भाग, ऑस्ट्रलियातील मेरीटाईम भागातही दिसतात.

Leave a Comment