कोडियक नावाने स्‍कोडा बिग साईज एसयूव्हीला लॉन्‍च करणार

skoda
मुंबई – स्‍कोडाने आपली नवी एसयूव्हीचे नाव ठरवले असून या एसव्हीला कंपनीने कोडियक असे नाव देण्याचे ठरवले आहे. हे नाव अलास्‍कामध्ये सापडणाऱ्या कोडियक अस्वलावरून ठेवण्यात आले आहे. याचसोबत स्‍कोडा देखील जनरल मोटर्स आणि रेनोल्टच्या पंक्तीत दाखल झाली आहे.

स्‍कोडाने आपल्या या एसयूव्हीलापहिल्यांदा जेनेव्हा ऑटो शो मध्ये सादर केले होते. कंपनीने याबाबत थोडी माहिती शेअर केली आहे आणि त्यानुसार कोडियाक ४.७ मीटर लांब एसयूव्ही असणार आहे. सेव्हन सीटर आसन क्षमता असणारी एसयूव्ही ४ बाय ४ ड्राइव्हसोबत येऊ शकते. यात २ लीटरवाला टीडीआई इंजिन असणार आहे. ही एसयूव्ही २०१७मध्ये जगभरात लॉन्‍च केली जाणार आहे.

Leave a Comment