केएफसी मध्ये स्वादिष्ट नेलपेंटचीही चाखा चव

nail
चिकन आणि चविष्ट मांसाहारी पदार्थ पुरवून खवैय्यांच्या केवळ पोटातच नव्हे तर हृदयावरही विराजमान झालेल्या केएफसीने खास नेलपॉलिशही विक्रीही सुरू केली आहे. वेगळ्या वासाचे हे नेलपेंट नखावर लावण्याबरोबरच ग्राहक खाऊही शकणार आहेत.

चिकनप्रमाणेच चवीला असणारे हे नेलपेंट दोन स्वादात उपलब्ध करून दिले गेले आहे. ओरिजिनल व हॉट अॅन्ड स्पायसी असे त्याचे दोन स्वाद आहेत आणि ते पूर्णपणे नैसर्गिक घटकांपासूनच बनविले असल्याचा कंपनीचा दावा आहे. नखांवर हे नेलपेंट लावून वारंवार चाखता येणार आहे. या नेलपेंटसाठी कंपनीने मॅककार्मिक अॅन्ड कंपनीबरोबर करार केला आहे. ही कंपनी केएफसीसाठी चिकन मसाला तयार करते. कंपनीने सध्या ग्राहकांना कोणताही एक स्वाद निवडा अशी विनंती केली आहे. ज्या स्वादाला अधिक पसंती मिळेल त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाणार आहे.

Leave a Comment