चीनमध्ये रोबो भिक्षू शानएर करणार धर्मप्रचार

monk
चीनमधील लाँगकुआन मंदिराने आर्टिफिशियल इंटेलिजन्स तज्ञांच्या सहकार्याने विस्मरणात चाललेल्या बौद्ध धर्माचा प्रसार व प्रचार करण्यासाठी रोबोचा वापर सुरू केला आहे. या निमित्ताने काळाबरोबर चालण्याची बौद्ध धर्माची लवचिकता दाखविण्याचा हा प्रयत्न आहे तसेच स्मार्टफोनच्या आहारी गेल्यामुळे अंतरात्म्यापासून दुरावत चाललेल्या आजच्या पिढीपर्यंत तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच धर्म संकल्पनेसाठी पोहोचणे हाही उद्देश साध्य होणार आहे.

या रोबोचे नांव शानएर असे केले गेले आहे. एर या चिनी शब्दाचा अर्थ बुद्दू असा आहे मात्र हा लाडाने हाक मारण्याचा शब्द आहे. हा रोबो आसपासच्या वातावरणाचा अंदाज घेऊ शकतो व व्हॉईस कमांडच्या सहाय्याने संभाषण करू शकतो. भगवे वस्त्र आणि डोक्याचे मुंडण अशा स्वरूपातला हा रोबो बौद्ध धर्मातील अनेक मंत्रांचे पठण करू शकतो तसेच बौद्ध धर्माची पायाभूत तत्त्वेही सांगू शकतो. ५०० वर्षांपासून या मंदिरात होत असलेल्या रोजच्या कार्यक्रमातील २० सोप्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. ही उत्तरे रोबोच्या पोटावर बसविलेल्या टच स्क्रीनवर दिसू शकतात.

या रोबोचा मालक समजला जाणारा भिक्षू शियानफियान याच्या मते हा रोबो पारंपारिक बौद्ध धर्म लोकांपर्यंत सहज पोहोचविण्यास मदत करतो आहे.

Leave a Comment