अक्षयतृतीयेला येणार सोन्याची तोळा नाणी

gold
अक्षय्यतृतीयेला सोनेखरेदीचे महत्त्व लक्षात घेऊन सोनेचांदी शोधन व्यवसायातील कंपनी एमएमटीसी पँप ने तोळा नावाने नवीन सोन्याची नाणी बाजारात आणली असून हे नाणे अष्टकोनी आहे. भारतात पूर्वीपासून सोन्याचे वजन तोळ्यात करण्याची प्रथा आहे. हा तोळा म्हणजे ११.६६३९ ग्रॅमचे वजन. नवीन नाणे या वजनाचे व ९९९.९ शुद्ध सोन्याचे आहे. या वित्तीय वर्षात ही कंपनी अशी ५ लाख नाणी बाजारात आणत आहे.

कंपनीचे प्रमुख राजेश खोसला म्हणाले भारतात तोळा हे सोन्याचे पारंपारिक माप आहे. मेट्रीक प्रणाली वापरात आल्यानंतर हे ऐतिहासिक वजन चलनातून गेले. तोळा यात पूर्वीच ज्ञान आहे. त्यामुळे आम्ही ही नाणी तयार केली असून लवकरच अर्धा तोळा व पाव तोळा वजनाची नाणीही बाजारात आणणार आहोत. सुरवातीला ही नाणी एमएमपीसी पँप दुकाने, स्टॉक होल्डींग कार्पोरेशन ऑफ इंडिया, इंडियन पोटॅश लिमि.,चेन्नईसह २८ शहरातील प्रमुख सराफांकडे उपलब्ध होणार आहेत.

एमएमपीसी पँप ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून ती एमएमटीसी व स्वित्झर्लंडची पँप यांचे संयुक्त व्हेंचर आहे. या कंपनीची वर्षाला २०० टन सोने व ६०० टन चांदी शोधन क्षमता आहे.

Leave a Comment