स्टेट बॅंकेत होणार तब्बल २२०० जागांसाठी भरती

sbi
मुंबई – प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियात भरती करण्यात येणार आहे. बॅंकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी एकूण २२०० पदांसाठी भरती केली जात असल्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधरांसाठी एक चांगली चालून आली आहे.

२२०० पदांसाठी केल्या जात असलेल्या या भरतीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवीधर अर्ज करू शकतात. किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेले उमेदवारही या पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी ४ मेपासून अर्ज स्विकारण्याची सुरूवात झाली असून २४ मेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता.

एकूण पदे: २२००
पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर
पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा शेवटच्या वर्षाला असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
वय मर्यादा: या पदांसाठी अर्ज करणारे सर्व उमेदवार १ एप्रिलपर्यंत २१ ते ३० या वयोगटातील असायले हवे. राखीव जागांसाठी अर्ज करणा-या उमेदवारांना वयात सूट दिली जाणार.

कॅटेगरीनुसार पदे:
ओपन: १०२८
ओबीसी: ५९०
एससी: ३५१
एसटी: २३१

Leave a Comment