रेल्वे देणार कॅन ऑन डिलिव्हरी बुकींग सेवा

irctc
ऑनलाईन शॉपिंग व कॅश ऑन डिलिव्हरी या सेवांना जनमानसात लाभलेली लोकप्रियता लक्षात घेऊन भारतीय रेल्वे ऑनलाईन तिकीट बुकींग कॅश ऑन डिलिव्हरी सेवा देणार आहे. रेल्वेच्या आयआरसीटीसी( इंडियन रेल्वे केटरिंग अॅन्ड टूरिझम कार्पोरेशन) ला ही सेवा सुरू करण्याचे आदेश दिेले गेले आहेत त्यादृष्टीने सॉफटवेअरमध्ये आवश्यक ते बदल करण्यास रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदिल दाखविला आंहे. या योजनेमुळे लोकांना घरबसल्या रिझर्व्हेशन मिळणार आहे व रेल्वेच्या उत्पन्नातही भर पडणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रिझर्व्हेशन पोहोचविण्यासाठी रेल्वेकडून स्लीपर क्लाससाठी प्रति तिकीट ४० रूपये व एसी क्लाससाठी प्रतितिकीट ६० रूपये आकारले जाणार आहेत. एटीएम अथवा क्रेडीट कार्ड न वापरणारे तसेच ऑनलाईन बॅकींग न करणारे पण ऑनलाईन शॉपिंग करणारे ग्राहक रेल्वेने या योजनेसाठी नजरेसमोर ठेवले आहेत. यासाठी ऑनलाईन बुकींग करताना कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन दिसेल. या योजनेअंतर्गत पाच दिवस अगोदर तिकीट बुक करता येईल मात्र बर्थसाठीचे कन्फर्मेशन तिकीटाचे पैसे मिळाल्यानंतरच दिले जाईल. तत्काळ अथवा पाच दिवसांपूर्वीची तिकीटे या योजनेतून मिळणार नाहीत.

पाटण्यासह २०० शहरात या योजनेची सुरवात केली जाणार आहे. यामुळे तिकीटांसाठी गर्दीत उभे राहण्याची वेळ येणार नाही व स्टेशनवरही गर्दी कमी होईल.

Leave a Comment