मायक्रोमॅक्सचा मायक्रो यूयू ५५३० रेकार्डब्रेक स्मार्टफोन

micro
भारतीय कंपनी मायक्रोमॅक्सने त्यांच्या यू टेलिव्हेंचर्स या सबब्रँड खाली नवीन स्मार्टफोन बाजारात याच महिन्यात लाँच होत असल्याचे जाहीर केले आहे. फ्लॅगशीप ब्रेकर या नावाने या नव्या फोनचे ब्रँडींग केले जात आहे व मायक्रो यूयू ५५३० या कोडनेमने तो लिस्ट केला गेला आहे. मिडीया टेक हेलिओ एक्स १० प्रोसेसर हे या फोनचे वेगळेपण आहे.

मायक्रोमॅक्सचे संस्थापक राहुल शर्मा या संदर्भात म्हणाले की आमचा नवा स्मार्टफोन रेकॉर्डब्रेक फोन आहे. हा फोन अत्यंत आकर्षक तर आहेच पण तो किंमतीच्या दृष्टीनेही आकर्षक आहे. हा फोन ग्राहकांना नक्कीच भुलवेल. या फोनसाठी ४ जीबी रॅम, ५.१ अँड्राईड ओएस, साडेपाच इंची फुल एचडी स्क्रीन, ३२ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, १३ एमपीचा एलईडी फ्लॅशसह रिअर कॅमेरा, ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा, ड्युअल सिम अशी फिचर्स आहेत.

हा फोन फोरजी, थ्रीजी, वायफाय सपोर्ट करतो व तो काळ्या व पांढर्‍या रंगात उपलब्ध होणार आहे. कंपनीचा यू युपोरिया नंतरचा हा दुसरा ४ जीबी रॅमवाला फोन आहे.

Leave a Comment