नव्या स्टाईलमध्ये आली होंडा डिओ

honda-dio
नवी दिल्ली – मोटारसायकल उत्पादक होंडा मोटरसायकल एंड स्कूटर इंडियाने होंडा डिओचे अपडेटेड मॉडल लॉन्च केले आहे. दिल्लीत याची एक्स-शोरूम किंमत ४८,२६४ रुपये ठेवण्यात आली आहे. नवी डिओ नव्या मॅट एक्सिस ग्रे रंगात उपलब्ध आहे.

होंडा डिओचे अपग्रेडेड मॉडल लॉन्च करताना कंपनीचे उपाध्यक्ष (सेल्स, मार्केटिंग) यदविंदर सिंह गुलेरिया म्हणाले, आम्ही आपल्या प्रोडक्ट पोर्टफोलियोला वारंवार रिफ्रेश करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आम्ही ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करू.

यापूर्वी २००२मध्ये होंडा डिओचे पहिले मॉडेल लॉन्च केले होते. तेव्हापासून सर्वाधिक विकली जाणारी मोटारसायकल म्हणून ओळखली जाते. दरम्यान कंपनी ही स्कूटर कोलंबिया, मॅक्सिको, श्रीलंका आणि नेपाळमधून निर्यात केली जात आहे. होंडा डिओच्या नव्या मॉडेलच्या इंजिनमध्ये कोणताच बदलाव केलेला नाही. यात १०९.२ सीसी एअर कूल्ड, ४-स्ट्रोक इंजिन देण्यात आले आहे. जे ८ बीएचपी पॉवर आणि ८.७७ एनएम टॉर्क देते.

Leave a Comment