Le 1s स्मार्टफोनचा १२ मे रोजी फ्लॅश सेल

le-1s
मुंबई : नुकत्याच चीनची स्मार्टफोन कंपनी लेईकोने लॉन्च केलेल्या Le 1s हा स्मार्टफोनने रजिस्ट्रेशनच्या बाबतीत विक्रम केला आहे. तब्बल एक लाख लोकांनी २४ तासात या फोनची नोंदणी केली आहे.

हा स्मार्टफोन कंपनीने ३ मे रोजी लॉन्च केला होता. या फोनचा पहिला फ्लॅश सेल १२ मे रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर या फोनची विक्री होईल. Le 1s ची किंमत १०,८९९ रुपये आहे. मात्र कंपनी सुरुवातीचे १ लाख हॅण्डसेटची विक्री ९,९९९ रुपयांना करणार आहे. Le 1s हा एंट्री लेव्हलचा मात्र अतिशय उत्तम फीचर्सने सज्ज असा स्मार्टफोन आहे.

कसा आहे Le 1s स्मार्टफोन –
Le 1s या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाचा एचडी स्क्रीन देण्यात आला आहे. ज्याचे रिझॉल्यूशन १०८०×१९२० पिक्सल एवढे आहे. याचा प्रोसेसर ६४ बिट ऑक्टा-कोरचा असून यात ३ जीबी रॅम देण्यात आले आहेत. याचा रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सलचा तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सलचा आहे. याची इंटरनल मेमरी ३२ जीबीची आहे. या स्मार्टफोनमध्ये “मिरर फिंगरप्रिंट सेन्सर” हे खास तंत्रज्ञान देण्यात आले आहे. Le 1s स्मार्टफोनमध्ये टाईप सी रिव्हर्सिबल केबलसह फास्ट चार्जिग सुविधा असेल. यामध्ये फोन ५ मिनिटांत एवढा चार्ज होईल की युझर ३.५ तास सहजपणे वापरु शकतो. या फोनमध्ये आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड़, मल्यायम, मराठी, उडिया, पंजाबी, तामिळ आणि तेलुगू अशा दहा भारतीय भाषांना Le 1s हा स्मार्टफोन सपोर्ट करेल.

Leave a Comment