लेईकोची स्मार्ट इलेक्ट्रीक कार सादर

lesee
स्मार्ट टिव्ही, स्मार्ट फोन व ऑनलाईन कंटेंटसाठी प्रसिद्ध असलेल्या लेईको या चिनी कंपनीने आता ऑटो क्षेत्रात प्रवेश केला आहे. त्यांनी त्यांची पहिली स्मार्ट इलेक्ट*ीक कार लीसा नावाने सादर केली असून या कारसाठी ब्रिटनच्या स्पोर्टस कारनिर्मिती कंपनी अॅस्टन मार्टिनशी भागीदारी केली आहे. बिजिंग मोटर शो मध्ये ही कार सादर केली गेली आहे व ती भारतातही लॉँच करण्याचा कंपनीचा विचार आहे.

लेईकोची ही इलेक्ट्रीक सुपरकार थेट टेस्लाला टक्कर देईल. कंपनीने आपल्या ले ऑटो या सबब्रँडखाली या कारची निर्मिती केली आहे. ही कार १३० ते २१० किमी प्रतितास वेगाने धावू शकते आणि ती स्मार्टफोनच्या सहाय्याने कंट्रोल करता येते. ही कार स्वतःच चालणारी आणि स्वतःच पार्क होणारी आहे. कंपनीचे सहसंस्थापक लेई यांच्या म्हणण्यानुसार आमची ही कार भविष्यातील वाहनगरजा पूर्ण करणारी आहे. या कारला स्मार्टस्क्रीन दिला गेला आहे. चालकाचा कांही गोंधळ होत असेल तर ही कार त्याला मार्गदर्शनही करू शकणार आहे.

Leave a Comment