रॅनबॅक्सीच्या माजी प्रमोटर बंधूंना न्यायालयाचा दणका

combo
नवी दिल्ली : सिंगापूर न्यायालयाने रॅनबॅक्सी लॅबोरेटरीजचे माजी प्रमोटर बंधू मालविंदर मोहन सिंग आणि शिविंदर मोहन सिंग यांना मोठा झटका दिला आहे. दोन्ही बंधूंवर आपले भागभांडवल विकताना जपानची औषध कंपनी दाईची सांक्योला सत्य लपविल्याचे आणि समभागांना अपूर्ण स्थितीत सादर केल्याने लवाद न्यायालयाने (कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन) ने ४०० दशलक्ष डॉलर (२६०० कोटी रुपये) दंड लावला आहे. वर्ष २००८ मध्ये जपानी कंपनीला दोन्ही बंधूंनी आपले भागभांडवल २.४ अब्ज डॉलरमध्ये विकले होते.

याबाबत वर्ष २०१३मध्ये सिंगापूरमध्ये लवादाकडे दाईचीने तक्रार दाखल केली होती. यामध्ये त्यांनी भारतीय प्रमोटरांवर सत्य स्थिती लपविल्याचा आणि त्याचे चुकीचे सादरणीकरण केल्याचा आरोप ठेवला होता. यूएस डिर्पाटमेंट ऑफ जस्टिसला रक्कम देण्यामुळे तोटय़ात गेलेल्या या जपानी कंपनीने लवादाकडे भरपाई रक्कम मागितली होती. त्यानंतर लवादाने हा निर्णय दिला आहे.

लवादाच्या या निर्णयामुळे मालविंदर मोहन सिंग यांना मोठा झटका बसला आहे. त्यांचे लहान बंधू याच्यापूर्वीच कंपनीच्या कार्यकारी पदावरून दूर गेले आहेत. ते पंजाबमधील प्रसिद्ध आध्यात्मिक संघटना राधा स्वामी सत्संग व्यासाशी जोडले गेले आहेत. या संघटनेचे मुख्यालय अमृतसर येथे आहे. याबाबत मालविंदर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Leave a Comment