गरम पाण्याची विहीर राजस्थानात सापडली

hot-water
उदयपूर- मृद शास्त्रज्ञांना राजस्थानातील पाली आणि बेवार जिल्ह्यांना जोडणा-या राज्यमहामार्गावरील बिचर्डी गावात गरम पाण्याची विहीर सापडली आहे.

या विहिरीतील पाण्याचे तापमान थंडीच्या दिवसातही ५८ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले आहे. ही विहीर एका खासगी जागेत असून जागा मालकाला मात्र तिचे महत्त्व ओळखता आलेले नाही. त्याच्या मते, गरम पाण्याची विहीर म्हणजे आपल्या घराण्याला मिळालेला शाप आहे, अशी त्याची समजूत आहे. अशी विहीर अत्यंत दुर्मिळ असून तांत्रिक भाषेत अशा विहिरींना जिओथर्मल वेल्स या नावाने ओळखले जाते. भुराराम नावाच्या एका गरीब शेतक-याची ही विहीर आहे. या विहीरीचे नाव नोखरा बेरा असे आहे.

भूजल विभाग आणि राष्ट्रीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाच्या अधिका-यांनाही येथे अशा स्वरुपाची विहीर असल्याची कल्पना नव्हती. यामुळे ही विहीर राजस्थानमधील अशा स्वरुपाची पहिलीच विहीर असल्याची शक्यता आहे, असे भूगर्भशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या पुष्पेंद्र सिंह राणावत यांनी सांगितले. शेतीला पुरवठा करण्यासाठी या विहिरीचे पाणी रोज थंड करावे लागते, याबद्दल मात्र भुरारामने नाराजी व्यक्त केली.

Leave a Comment